महेश उर्फ माक्या शिरतोडेच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई


स्थैर्य, फलटण, दि.१: मोतीचौक, रविवार पेठ, फलटण येथील कुविख्यात आरोपी महेश उर्फ माक्या शिरतोडेच्या टोळीवर हत्याराचा धाक दाखवून मारहाण करुन मारण्याची भिती दाखवून, दरोडा, गंभीर दुखापतीसह जबरी चोरी असे गुन्हे गेल्याचे निष्पन्न झााल्याने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

वाठार पोलीस स्टेशन हद्तदीत दि.25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12:30 वा. चे सुमारास मौजे सोळशी गावचे हद्दीत फिर्यादी व त्यांचे पती फॉरेस्टचे जवळून डोंगरावतील पवनचक्कीला तयार केलेल्या रोडने केदारेश्वर मंदिराकडे जात असताना 3 इमांनी त्यांना दगडाचा धाक दाखवून मारहाण करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 2 लाख 51 हजाराचा मुद्देमाल चोरी नेल्याचा गुन्हा वाठार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (रा.मोतीचौक, फलटण), विकास उर्फ लाल्या उर्फ कानिफनाथ अनिल जाधव (रा.बावधन, ता.वाई, जि.सातारा), हिमालय सतिश धायगुडे (रा.खेड बु., ता.खंडाळा, जि.सातारा) यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. प्रस्तावित गुन्ह्यामधील गेला माल सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आरोपींना वापरलेली वाहने व मिळालेल्या पैशातून खरेदी केलेली वाहने असा एकूण 4 लाख 8 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यता आला.

प्रस्ताविक गुन्ह्याचे तपासी अधिकारी, वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांना गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींनी संघटितपणे फलटण ग्रामीण, फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर व तालुका, महाबळेश्वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा तसेच पुणे जिल्ह्यात बारामीत तालुका या ठिकाणी जबरी चोर्‍यांचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने संघटीत गुन्हेगारी नियंत्रण 1999 अन्वये कारवाई करीता महेश उर्फ माक्या शिरतोडेसह विकास उर्फ लाल्या उर्फ कानिफनाथ जाधव, हिमालय धायगुडे यांचे विरुद्ध प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्ष कमनोज लोहिया यांनी मंजूरी दिली असून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण गणेश किंद्रे, कँप कोरेगाव हे करीत आहेत.

या कारवाईकरिता सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सातारा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोगडे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रविण शिंदे, सचिन जगताप, तानाजी चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे.


Back to top button
Don`t copy text!