दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड संचलीत तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर यांची मान्यता असलेले ‘कीर्तन महाविद्यालय’ सज्जनगड (ता. सातारा) येथे सुरू झाले आहे, अशी माहिती श्री रामदास स्वामी संस्थानचे श्री समर्थ वंशज भूषण स्वामी यांनी दिली आहे.
या महाविद्यालयात ‘कीर्तशास्त्र पदविका (बी.ए. कीर्तनशास्त्र)’ हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमात नामवंत कीर्तनकार, अभ्यासक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. तरी कीर्तनाभ्यास करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. प्रवेशाची अंतिम तारीख दि. १२ सप्टेंबर २०२३ आहे, असे भूषण स्वामी यांनी सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी सज्जनगड संस्थान – ९५४५९७८०३८, ९४२३०३४११२/१६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.