दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सोमंथळी, ता. फलटण येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मारूतीला ‘नवश्या मारूती’ संबोधले जाते. आज, दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी श्रावणाच्या शेवटच्या शनिवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६ वा. महाआरती, सकाळी ८ ते ९ प्रवचन – ह. भ. प. हनुमंत महाराज सोडमिसे, सकाळी ९ ते १२ किर्तन – ह. भ. प. पांडुरंग महाराज सोडमिसे, दुपारी १२ ते संध्याकाळपर्यंत संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १ वाजल्यापासून सार्वजनिक महाप्रसादाला सुरूवात होईल ती रात्री ९.३० वाजेपर्यंत.
सोमंथळी येथील हे दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या हनुमानाच्या दर्शनीसाठी मुंबई, पुणे, सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. २०२१ पासून प्रत्येक शनिवारी प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. ग्रामस्थांमार्फत फराळाचे वाटपही करण्यात येते. जर पौर्णिमेला श्री हनुमान पालखी प्रदक्षिणा, महाप्रसादाचे नियोजन कार्यक्रमाची परंपरा चालत आली आहे. ती ग्रामस्थांनी तशीच परंपरागत चालू ठेवली आहे.
आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ फलटण तालुका व सोमंथळी पंचक्रोशीतील सर्व भाविकभक्तांनी घ्यावा, असे आवाहन हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष संजय सोडमिसे व ट्रस्ट सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.