दैनिक स्थैर्य | दि. १३ सप्टेंबर २०२४ | फलटण | तालुक्यातील साखरवाडी येथील साखरवाडी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा खोखो खेळातील सुवर्णपदक प्राप्त करणारी खेळाडू सौ. प्रियांका येळे – केसकर हिची राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनायामध्ये खेळाडू प्रवर्गातून थेट नियुक्ती करण्यात आली आहे.
फलटण तालुक्यातील साखरवाडी गावची कन्या सौ. प्रियांका येळे – केसकर हिची महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत खेळाडू भरतीमध्ये थेट नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सौ. प्रियांका येळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साखरवाडी विद्यालय, साखरवाडी या ठिकाणी झाले असून तिने खोखो खेळामध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. भारत सरकारच्या दर ४ वर्षांनी होणाऱ्या नॅशनल गेम्समध्ये २०१५ सालच्या खेळामध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे या अंतर्गत थेट नियुक्ती करण्यात आली आहे.