शिवराज्यभिषेकाच्या दिनानिमित्त खाकीचेही रक्तदान


स्थैर्य, सातारा, दि. 09 : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आणि शिवसंकल्प  प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी खाकी देखील धावून आली. सपोनि उत्तम भापकर यांचेसह 35 जणांनी रक्तदान करुन सामाजिक बाधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा काहीसा भरून काढण्यासाठी शासनाने केलेल्या आवाहनाला  शिवसंकल्प प्रतिष्ठानने प्रतिसाद देत चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आज रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते .

यामध्ये शिवसंकल्प कार्यकर्त्यांच्या मदतीला खाकी देखील धावून आली. सपोनि उत्तमराव भापकर यांच्या सह त्यांच्या सहकायांनी देखील रक्तदान करून सामाजिक बंधिलकि जपली. कोरोनाच्या महामारीमुळे रक्तपेढय़ांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही टंचाई भरून काढण्यासाठी शिवसंकल्पने आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने राबवलेला उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे. आपलाही यामध्ये वाटा असावा याभावनेने रक्तदान केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!