कौशिक प्रकाशनच्या ‘सौंदर्य लहरी’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या शनिवारी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, सातारा, दि. १६ जून : येथील कौशिक प्रकाशनाच्या वतीने आद्य श्री शंकराचार्य विरचित ‘सौंदर्य लहरी’ या ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, दि. २० जून रोजी साताऱ्यात आयोजित करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

पुस्तकाची प्रमुख वैशिष्ट्ये:

या विशेष पुस्तकात आद्य श्री शंकराचार्यांच्या ‘सौंदर्य लहरी’ मधील मूल श्लोक, त्यांचा अन्वय, प्रतिपद-अर्थ (शब्दानुसार अर्थ), सरलार्थ आणि सविस्तर भावार्थ यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रकाशन सोहळ्याचा तपशील:

  • दिनांक व वेळ: शनिवार, २० जून, सायंकाळी ६:०० वाजता.

  • स्थळ: समर्थ सदन, राजवाडा, सातारा.

  • प्रकाशन हस्ते: डॉ. सौ. सुचेता परांजपे, पुणे (वैदिक वाङ्मयातील विद्यावाचस्पती तसेच वैदिक वाङ्मय आणि भारतीय विद्या विषयाच्या प्राध्यापिका).

  • अध्यक्षस्थान: वे. मू. विवेकशास्त्री गोडबोले, सातारा (प्राचार्य, श्री कृष्ण यजुर्वेद पाठशाळा आणि वेद-वाङ्मयाचे व्यासंगी).

या महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमाला सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सौ. अंजली अशोक गोडबोले (संपर्क: ७४९९० ९१२५४) आणि डॉ. मीरा दीक्षित यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!