कै. जानोजीराव मालोजीराव भोईटे पतसंस्थेच्या चेअरमनपदी पराग भोईटे

व्हा. चेअरमनपदी विजयकुमार भोईटे यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२४ | फलटण |
कै. जानोजीराव मालोजीराव भोईटे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हिंगणगाव या संस्थेच्या संचालक मंडळाच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदाच्या निवडणुकीत श्री. पराग शरदराव भोईटे- इनामदार यांची चेअरमनपदी व श्री. विजयकुमार कृष्णराव भोईटे यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

स्व. शरदराव भोईटे – इनामदार (मा. सभापती) यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी सन २००० मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेची वार्षिक उलाढाल ९ कोटी एवढी असून संस्था ऑडिट वर्ग ‘अ’ मध्ये आहे. या पतसंस्थेने सामाजिक हित जोपासताना पर्सनल लोन, मॉर्गेज लोन तसेच गोल्ड लोन व लॉकर सुविधा उपलब्ध केली आहे. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील ही एक अव्वल पतसंस्था समजली जाते.

या निवडीवेळी श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.


Back to top button
Don`t copy text!