कबड्डीपटू गजानन तांबे यांचा प्रथम स्मृतिदिनाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । वडाळा बीपीटी विभागातील सम्राट संघाचे संघप्रमुख तसेच प्रसिद्ध कबड्डीपटू व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन कृष्णा तांबे मु. साखरगाव, ता. खेड जिल्हा रत्नागिरी हे संघाचे संघप्रमुख तसेच प्रसिद्ध कबड्डीपटू व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते होते.

दिवंगत गजानन तांबे यांचा प्रथम स्मृतिदिन दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता, साई विसावा, रूम नं. १०९ इंडियन ऑइल पेट्रोल पंप शेजारी, रुईया महाविद्यालया समोर, माटुंगा, मुंबई -१९ येथे त्यांच्या राहत्या घरी करण्याचे योजिले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून दिवंगत गजानन तांबे यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती संतोष तांबे, राजेश तांबे, शैलेश तांबे यांनी काढलेल्या परिपत्रकात केली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!