कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । मुंबई ।  कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्रीताई चंद्रकांत जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी श्रीमती जाधव यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनीही यावेळी श्रीमती जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

या भेटी प्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज तथा बंटी डी. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेचे पदाधिकारी अरूण दुधवडकर, संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!