‘गिरीधर सायन्स अकॅडमी’च्या जयदीप कदमचे ‘जेईई’ परीक्षेत घवघवीत यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२४ | फलटण |
फलटण येथील नामांकित व कायमच १०० % निकालाची उज्ज्वल परंपरा असणार्‍या गिरीधर सायन्स अकॅडमीच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी व मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामधील २० विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत ९० पर्सेंटाईलपेक्षा जास्त मार्क मिळाले असून जयदीप कदम या विद्यार्थ्याने ९९.७५ पर्सेंटाइल गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच जयदीप कदम याने ‘जेईई मेन’ परीक्षेत ९५.९३ टक्के आणि ‘जेईई अ‍ॅडव्हान्स (एअर (सीटीजी)) या परीक्षेत ७८ वी रँक मिळविली आहे.

त्याच्या या यशाबद्दल गिरीधर अकॅडमीचे शिवराज भोईटे, मयूर भोईटे, मंदार पाटसकर यांनी विशेष अभिनंदन केले. आयडियल स्कूल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. डॉ. वैशाली शिंदे, संचालिका प्रा. सुनिता जाधव यांच्या हस्ते त्याचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक वृंद उपस्थित होता.


Back to top button
Don`t copy text!