दैनिक स्थैर्य । दि. २५ जानेवारी २०२३ । मुंबई । इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने आज घोषणा केली की, त्यांनी प्राथमिक मार्गाच्या माध्यमातून चेकइन (cheQin) मधील बहुतांश ५५ टक्के हिस्सा संपादित केला आहे. चेकइन अद्वितीय रीअल-टाइम मार्केटप्लेस आहे, जे पर्यटकांना कोणत्याही प्रयत्नाशिवाय हॉटेलियर्ससेाबत बारगेन (किफायतशीर सौदा) करण्याची सुविधा देते. कंपनी पर्यटकांना थेट हॉटेलमध्ये देय भरण्यास प्रोत्साहित करते आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाची खात्री घेते, ज्यामुळे ते सर्वात पैशाचे मोल करणाऱ्या हॉटेल्समध्ये राहण्यास, संपूर्ण हॉटेल बुकिंग अनुभवामध्ये परिवर्तन घडवून आणण्यास सक्षम होतात. चेकइन वेब, अँड्रॉईड व आयओएस अॅप्सच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते.
इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक श्री. निशांत पिट्टी म्हणाले, ‘‘इझमायट्रिप आपल्या नॉन-एअर विभागांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. हे संपादन सहयोगाने हॉटेल व्यवसायामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याच्या दिशेने पाऊल आहे. हॉटेल उद्योगातील अद्वितीय अॅप चेकइनच्या माध्यमातून इझमायट्रिप तंत्रज्ञान पाठिंब्याद्वारे आपल्या हॉटेल बुकिंग अनुभवामध्ये विविधता आणेल. आमचा दृढ विश्वास आहे की, चेकइन सर्व विभागांमध्ये अद्वितीय पर्याय देते आणि यामध्ये क्रॉस-सेलिंगचे प्रमाण वाढवण्याची व दृढ करण्याची क्षमता आहे. आम्हाला या संधीचा आनंद होत आहे आणि आम्ही दोन्ही कंपन्यांच्या सहयोगासह आदरातिथ्याच्या नवीन युगात प्रवेश करण्यास उत्सुक आहोत.’’
कंपनी ‘चेकइन’ अॅप्लीकेशनचा वापर करत हॉटेलियर्सना रिअल-टाइम बुकिंग विनंती प्राप्त करण्यास आणि त्यांच्या स्वत:च्या बुकिंग्जवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढवण्यास मदत करते. चेकइन हॉटेलियर्सना मागणीचे सर्वसमावेशक व्ह्यू देते आणि त्यांना किंमतीचे सर्वोत्तम नियमन करण्याची सुविधा देते, ज्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीजची विक्री अधिक जलदपणे करता येते. व्यवसाय हॉटेलियर्सना मोफत साइनअप, एका क्लिकमध्ये डॅशबोर्ड अॅक्सेस, रिअल-टाइम कॉम्पीटिशन डेटा आणि नियमित कमिशन पेमेंट्स यांसह इतर उल्लेखनीय फायदे देखील देते.