भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २५ जानेवारी २०२३ । सातारा । संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांच्यामार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी दि. 16 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्विसेस या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेची पूर्व तयारी करुण घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र  नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी दिली.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेस मुलाखतीस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपस्थित रहावे. मुलाखतीस येते वेळेस फेसबूक पेजवर Depatment of sainik welfare pune (DSW) वर सर्च करुन त्यामधील CDS-60 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) पवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्र. 0253-245031 व 245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!