इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांवर मेगा भरती; कोणतीही परीक्षा व मुलाखत नाही, थेट अशी होईल निवड!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (IOCL) मार्केटिंग डिव्हिजनअंतर्गत ईस्टर्न रीजनमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ट्रेड, टेक्नीशियन, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या एकूण ४०९ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ डिसेंबर २०२६ आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १६ नोव्हेंबर : सरकारी तेल कंपनी असलेल्या आयओसीएलमध्ये (IOCL) करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण ४०९ अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम १२ महिन्यांचा असणार असून, यादरम्यान उमेदवारांना नियमांनुसार दरमहा निश्चित स्टाइपेंड दिला जाईल. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही, त्यामुळे इच्छुकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

पात्रता आणि निवडीची प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे, तसेच आरक्षित वर्गाला नियमानुसार सवलत मिळेल. शैक्षणिक पात्रतेमध्ये पदांनुसार १० वी पाससह आयटीआय (ITI), संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या (गुणवत्ता यादी) आधारावर केली जाणार असून, कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. इच्छुक उमेदवार १२ डिसेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!