दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२४ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण या संस्थेस वैशिष्ट्यपुर्ण व उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा सन २०२२ – २३ या वर्षाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा दि. १२ मार्च २०२४ रोजी मुंबई येथे होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांना समाज कल्याण कार्यालय, साताराचे अधिकारी श्री. श्रीकांत जगदाळे यांनी दिले.