राजे गटाला खासदार रणजितसिंह यांच्या विकासकामांची धडकी : माजी नगरसेवक अशोकराव जाधव


दैनिक स्थैर्य | दि. 09 मार्च 2024 | फलटण | गेल्या 30 वर्षांपासून फलटण नगर परिषदेवर राजे गटाची सत्ता आहे. गेले तीस वर्ष झोपलेला राजे गट हा माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास कामांची पद्धती बघत राजे गटाला धडकी भरली आहे. त्यामुळे ज्या कामांची मंजुरी आहे परंतु वर्कऑर्डर नाही; अशा कामांचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे; असे मत फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले.

दोन दिवसांपूर्वी फलटणच्या राजे गटांनी पत्रकार परिषद घेऊन फलटण शहरांमध्ये विविध विकास कामे आणले असल्याचे यादी वाचली. वास्तविक गेल्या 30 वर्षांपासून फलटण नगर परिषदेवर राजे गटाची सत्ता आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये जे जमले नाही ते माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये करून दाखवले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाची कार्यपद्धती बघून राजे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळेच फक्त मंजूर असलेल्या कामांची भूमिपूजनाचा सपाटा राजे गटानी लावला आहे. असा आरोप फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केला.

त्या स्वीकृत नगरसेवकाला सात वर्षांनी मलठणची आठवण

गेली सात वर्षे मलठण परिसरामध्ये होत असलेल्या विकासकामांमध्ये खिळ घालण्याचे काम राजे गटाच्या स्वीकृत नगरसेवकानी कायम केले आहे. मलठण भागामध्ये मंजूर असलेले कामे जिल्हाधिकारी यांच्याकडून रद्द करण्याचे काम याच स्वीकृत नगरसेवकानी कायम केले होते. आत्ता असलेल्या भूमिपूजनांमध्ये मलठणच्या काही भूमिपूजनांचा समावेश आहे.‌ तब्बल सात वर्षांहून अधिक काळाने त्या स्वीकृत नगरसेवकाला मलठणची आठवण झाली आहे; असा टोलाही यावेळी अशोकराव जाधव यांनी लगावला.


Back to top button
Don`t copy text!