‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री. दादासाहेब चोरमले यांना जाहीर

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ कुरवली बुद्रुक येथील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाला घोषित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२४ | सातारा |
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत समाजकल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणार्‍या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पात्र व्यक्ती व संस्थांना २०१९-२०२०, २०२०-२०२१ ,२०२१-२०२२, २०२२-२०२३ सालचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. या पुरस्कारामध्ये फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेला व श्री. कृष्णात उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे, तर ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ कुरवली बुद्रुक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाला घोषित झाला आहे.

हे विविध पुरस्कार नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस, जमशेदजी भाभा नाटयगृह, एनसीपीए मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे १२ मार्च २०२४ रोजी प्रदान करण्यात येणार आहेत.

सदर पुरस्कारांमध्ये सातारा जिल्ह्यातील खालील नमूद व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे.

 


Back to top button
Don`t copy text!