‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या मुलाखत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०२ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यपद्धती, महसूल वाढीसाठी सुरु असलेले प्रयत्न, तंत्रज्ञानाचा वापर, ठाणे, सातारा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून घेतलेले निर्णय, अशा विविध विषयावरील माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जाणून घेतली आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!