‘दिलखुलास’ कार्यक्रमात उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची १५ व १६ मार्च रोजी मुलाखत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२३ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 15 व गुरुवार दि.16 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंब तसेच महिलांचे बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आणि महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता गटांच्या व सर्व रोजगारीच्या उत्पादनांची प्रसिद्धी व विक्री मोठ्या प्रमाणावर व्हावी, यासाठी 8 ते 19 मार्च 2023 या कालावधीत महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे स्वरूप, बचत गटांना यामध्ये सहभाग घेण्याची प्रक्रिया तसेच या प्रदर्शनाचे नियोजन कशाप्रकारे करण्यात येते याबाबतची सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!