माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुलाखत


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहाय्यक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरूवार दि. 25 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

भारतात मतदारांचे प्रकार, मतदार होण्यासाठी आवश्यक पात्रता, मतदार यादीत नाव नोंदवणे, वगळणे व दुरुस्ती, फॉर्म नंबर 6 सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे, दावा अर्ज आणि आक्षेपांची पडताळणी, मतदार यादीमध्ये नोंदवलेल्या नावामध्ये मुद्रणदोष असल्यास तो दुरुस्त करण्यासाठीची पद्धती आदी विषयांची माहिती श्रीमती चौधरी यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!