‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची मुलाखत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० ऑक्टोबर २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमात नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी  सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

रस्ता सुरक्षा, रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना, रिक्षाचा सुसह्य आणि सुरक्षित प्रवास, वाहतूक समस्या अशा विविध विषयावर नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी  ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात विस्तृत माहिती दिली आहे. सुरक्षित प्रवास करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!