आंतरराष्ट्रीय महिलादिनी ‘ट्रेल’चा ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम


स्थैर्य, दि. ७: आंतरराष्ट्रीय महिलादिनी ट्रेल ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम करीत आहे. समाजातील मातांकडे पाहिल्यास असे दिसून येते की त्या एकाचवेळी गृहिणी, नोकरदार आणि कित्येक अन्य भूमिका निभावत असतात. करुणा भावाने त्या सामाजिक कार्य करत असतात. या विशेष दिनी ट्रेल आपल्या मंचावर उपस्थित टॉप ३ मॉम इन्फ्लुएन्सर्स शांभवी मिश्रा, निपा कामत आणि श्रीमा राय या अधिकाधिक महिलांना आपली आवड जपण्यासह व्यवसायपुढे नेण्याकरिता प्रेरित करणा-या महिलांच्या कार्याची ओळख करून देत आहे.

शांभवी मिश्रा किंवा टॉकसे यांनी पत्रकारीतेच्या करिअरमध्ये शिखरावर पोहोचल्यानंतर फॅशन आणि ब्युटी ब्लॉगिंग करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी त्या आई बनल्या आणि आता बेबी केअर उत्पादनांविषयीचा रोजचा अनुभव शेअर करण्यासाठी त्या त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.

निपा कामत आई झाल्यानंतरही त्यांनी दैनंदिन सौंदर्याच्या ट्रेंडबद्दल व्ह्लॉगिंग करणे सोडले नाही. त्यांचे आनंदी कौटुंबिक क्षण साजरे करतानाचे मुलांसोबतचे व्ह्लॉग्सदेखील त्या पोस्ट करतात.

श्रीमा राय या मॉमी फॅशनिस्टा असून एक आई सर्वकाही कसे करू शकते, याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या प्रोफाइलमध्ये चांगले पालकत्व निभावण्यापासून पँट बूट घालण्याच्या विविध पद्धती, या सर्वाची माहिती दिलेली आहे.

ट्रेल महिलांमधील एकता, आदरभाव आणि सुसंवाद वाढवण्यासाठी, त्यांनी एकत्रितपणे उभे राहण्यासाठी तसेच अधिक कणखर बनवण्यासाठी ‘सुपरस्त्री’ हा उपक्रम राबवत आहे.


Back to top button
Don`t copy text!