दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
आज भारतीय हॉकीसाठी व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतीय महिला हॉकी संघाने एशिया कप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या विजयाने भारतीय महिला हॉकी संघावर सर्व देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सुवर्णपदकाची कमाई करणार्या या भारतीय महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाखरी गावची सुवर्णकन्या कु. अक्षता आबासाहेब ढेकळे-पाटील हिचा समावेश असून तिने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व भारताला विजय मिळवून दिला आहे.
या स्पर्धेत लागोपाठ पाच मॅच जिंकून भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे.