साखर कारखान्याच्या कामगारांसाठी अस्तित्वात असणाऱ्या विम्यामध्ये कोरोनाचा समावेश करा; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निर्देश


स्थैर्य, फलटण : सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना या आजाराने प्रचंड मोठे थैमान घातले आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने हे मोठ्या प्रमाणावर आहेत. कामगारांसाठी साखर कारखाने हे विमा कवच उतरवत असतात. तरी या विमा कवचामध्ये कोरोना या आजाराचा समावेश करावा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांना दिलेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच सातारा व कोल्हापूर जिल्ह्याची कोरोना बाबतची स्थिती जाणून घेण्यासाठी कराड येथे आढावा बैठक आयोजित केलेली होती. या आढावा बैठकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी साखर कारखान्याच्या कामगारांसाठी असलेल्या विमा कवचामध्ये कोरोना या भयंकर आजाराचा समावेश करावा, असे निर्देश आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांना दिलेले आहेत.

सध्या कोरोना या आजाराने सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये चांगलेच थैमान घातले असून सध्या साखर कारखाने हे आपापले रोलर पूजन करून सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. तरी जर चुकून साखर कारखान्यांमधील सर्वसामान्य कामगारांना कोरोना या महाभयंकर आजाराने ग्रासले, तरी त्यांनाही उत्तम उपचार खाजगी रुग्णालय मार्फत मिळावेत. यासाठी कारखान्याच्या मार्फत सर्व कामगारांचा जो विमा उतरवला जात असतो. त्यामध्येच कोरोना या आजाराचा समावेश करावा, म्हणजे सर्वसामान्य कामगारांना खासगी रुग्णालयाद्वारे ही चांगले उपचार घेता येतील, याबाबत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांना कराड येथील आढावा बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!