
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १३ जून २०२४ | फलटण |
फलटण येथील सत्यजय डेंटल क्लिनिक व इंप्लांट सेंटरचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते तसेच श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी जि. प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
फलटण येथील डॉ. धनश्री ढवळे (बी.डी.एस.) यांनी सुरू केलेल्या या सत्यजय डेंटल क्लिनिकमुळे दंत रुग्णांना आधुनिक उपचार मिळणार असून हे क्लिनिक शॉप नं. १२, रॉयल प्लाझा, मगर हॉस्पिटलजवळ, रिंग रोड, फलटण येथे आहे.
