गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील १४ गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
सर्वत्र गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण साजरा होत असल्याने सणाचे कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, यादृष्टीने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वेळोवेळी गुन्हे करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे, दंगा, गोंधळ करणारे १४ गुन्हेगार यांना तडीपार करण्यात आले असून पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी फलटण ग्रामीण हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर प्रांताधिकारी फलटण यांचेकडे प्रस्ताव देण्यात आला होता. त्याअनुषंगाने त्यांनी या १४ गुन्हेगारांविरुध्द प्रातांधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचे आदेशाने तडीपार केले आहे.

१) मनोहर संजय जाधव, रा. साखरवाडी, ता. फलटण
२) सागर राजेंद्र गायकवाड, रा. आसू
३) आदिनाथ काशिनाथ मोटे, रा. सरडे
४) सचिन बाळु बोडरे, रा. पिंपळवाडी
५) खुशवंत लालासो चव्हाण, रा. विचुर्णी
६) सागर युवराज घाडगे, रा. मलठण
७) किरण भिमराव घाडगे, रा. मलठण
८ ) अक्षय अंकुश जाधव, रा. ताथवडे
९) सूर्यकांत मुगुटराव निंबाळकर, रा. राजाळे
१०) बबन चिंतामणी भिंगारे, रा. आसू
११) संतोष नामदेव जगताप, रा. सुरवडी
१२) अमित बाळासो जगताप, रा. विडणी
१३) विजय बापू कांबळे, रा. निंभोरे
१४) कुंदा अनिल चौधरी, रा. निंभारे

वरील १४ गुन्हेगारांना दि. १३/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ या कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात प्रवेश करण्यास आणि निवास करण्यास मनाई करण्याचे आदेश निर्गमीत केले असून नमूद इसमांना फलटण तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!