दैनिक स्थैर्य | दि. १२ मार्च २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (संस्था) २०२३’ आज मुंबईत जमशेदजी भाभा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. श्री. सचिन सूभाषराव सूर्यवंशी (बेडके) आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके) यांना प्रदान करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत समाजकल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणार्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पात्र व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.