खुंटे ग्रामपंचायतीवर राजे गटाचा झेंडा; सरपंचपदी हणमंत भिसे


दैनिक स्थैर्य | दि. १२ मार्च २०२४ | फलटण |
खुंटे (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राजे गटाने वर्चस्व राखत ग्रामपंचायतीवर आपल्या गटाचा झेंडा फडकविला आहे. सरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत हणमंत निवृत्ती भिसे हे विजयी झाले आहेत.

नूतन सरपंच, राजे गटाचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार घालून केला.

दरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी नूतन सरपंच व राजे गटाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!