स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सांगली महापालिकेत सत्तांतर, भाजपची सहा मतं फुटली, महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 23, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य,सांगली,दि २३: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपला आस्मान दाखवलं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत  सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी  यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.

फोडाफोडीच्या शक्यतेमुळे उत्सुकता शिगेला

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली.

सत्ताधारी भाजपमध्ये फूट

महापौर-उपमहापौर निवडीवरुन सांगलीत सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आणि ते नॉट रिचेबल झाले होते. बैठकीला 30 ते 32 नगरसेवकच उपस्थित होते. त्या रात्री तीन नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आले. त्यानंतर रात्री उशिरा तीस नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आले होते.

राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये

महापौर, उपमहापौर निवडीवरुन भाजपमध्ये कुरबुरी सुरु होत्या. गेल्या बुधवारी सायंकाळी महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे नाव निश्चित झाले. भाजपची नावे निश्चित होताच राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. त्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू केले.

महापौर, उपमहापौर निवडीत सध्या ‘मनी पॉवर’ची चर्चा रंगली होती. भाजप आणि विरोधी आघाडीकडून घोडेबाजाराला ऊत आल्याचंही चित्र होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता उलथवण्यासाठी पाच नगरसेवकांची गरज होती.

सांगली महापौरपदासाठी इच्छुक कोण होते?

सांगलीच्या विद्यमान महापौर गीता सुतार यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपली. सांगलीचे महापौरपद खुले असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली होती. सत्ताधारी भाजपकडून महापौर पदासाठी स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, गणेश माळी, निरंजन आवटी यांची नावे चर्चेत होती. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगलीत येऊन बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


ADVERTISEMENT
Previous Post

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनादेखील पास करण्याची मागणी

Next Post

इमरान सरकार संकटात, पाकिस्तानात विरोध प्रदर्शनाला जोर

Next Post

इमरान सरकार संकटात, पाकिस्तानात विरोध प्रदर्शनाला जोर

ताज्या बातम्या

फलटण तालुक्यातील सहा संशयितांची अहवाल कोरोनाबाधित

March 9, 2021

कोरोना प्रतिबंधक लस घ्या; लस सुरक्षित आहे : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर

March 9, 2021

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे आवाहन

March 9, 2021

गोखळी येथे जंतनाशक गोळ्या वाटप

March 9, 2021

महिलादिनी शेरेचीवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनायोद्ध्या रणरागिणींचा सन्मान

March 9, 2021

सोनगाव येथील ऐतिहासिक वेताळबाबा परिसराची ग्रामस्थांकडून स्वच्छता

March 9, 2021

कुस्तीमध्ये फलटणचे नाव देशपातळीवर पोहचवा : श्रीमंत संजीवराजे; क्रीडा संकुलात महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

March 9, 2021

बसाप्पा पेठेतील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाई, पालिकेने केली धडक कारवाई

March 9, 2021

आरटीओ चौकात अज्ञातांकडून टपर्‍यांची तोडफोडदोन लाखांचे नुकसान : व्यावसायिकांमध्ये खळबळ

March 9, 2021

भूखंड हडप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

March 9, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.