लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रशिक्षण वर्ग संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२४ | फलटण |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी ४३ माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत २५५, फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील नियुक्त केलेले क्षेत्रीय अधिकारी, विषयवार नियुक्त केलेले नोडल अधिकारी, तसेच सर्व संबंधित कर्मचारी यांचा प्रशिक्षण वर्ग आज सकाळी १०.०० वाजता मध्यवर्ती निवडणूक नियंत्रण कक्ष, बी.एस.एन. कार्यालयाशेजारी घेतला.

या प्रशिक्षण वर्गामध्ये २५५, फलटण विधानसभा मतदारसंघातील खालीलप्रमाणे प्राथमिक माहिती सांगण्यात आली.

  • एकूण मतदार – ३,३४,८५२
  • पुरूष मतदार – १,७१,४५३
  • स्त्री मतदार – १,६३,३८५
  • तृतीयपंथी मतदार – १४

या माहितीबरोबरच सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच गावपातळीवरील क्षेत्रीय कर्मचारी यांनी आपल्या नियुक्त गावामधील मतदान केंद्र सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या द़ृष्टीने मतदार जनजागृती पथकातील नोडल अधिकारी यांनी गावपातळीवर मतदार जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन, पथनाट्य किंवा कलापथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. तसेच इतर विषयांचे सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांना दिलेल्या जबाबदार्‍या काटेकोरपणे पाळण्याबाबतच्या सूचना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!