पालकमंत्र्यांच्या आदेशाची 24 तासांत अंमलबजावणी; नेर तलावातून रब्बीसाठी सोडले पाणी


 

स्थैर्य, विसापूर (जि. सातारा), दि.२४ : खटाव तालुक्‍याच्या उत्तर भागातील नेर तलावाच्या उजव्या कालव्यातून सोमवारी सायंकाळी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची कृष्णा सिंचन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 24 तासांतच अंमलबजावणी केल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी नेर तलावातील पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन रविवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले होते. पालकमंत्र्यांनी कृष्णा सिंचन विभागाला त्वरित पाणी सोडण्याचे आदेशही दिले होते. सोमवारीही त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या. सिंचन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरित हालचाली करून 24 तासांच्या आत पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली. सोमवारी सायंकाळी नेर धरणाच्या उजव्या कॅनॉलमधून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. सोडण्यात आलेले पाणी खातगुण, भांडेवाडी, खटाव, हुसेनपूर आणि सिद्धेश्वर कुरोलीपर्यंत जाणार आहे. गेल्या वर्षी कुरोलीच्या पुढील आठ किलोमीटर कॅनॉलची स्वच्छता केली असल्याने या वर्षी कुमठेपर्यंत पाणी पोचविले जाणार आहे. रब्बी हंगामासाठी वेळेत पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. 

युवतीस पळवून नेण्यास मदत केल्याप्रकरणी दोन गटांत तुफान राडा; नऊ जणांना अटक

पाणी सोडण्याची मागणी करताच पालकमंत्र्यांच्या आदेशाने रब्बी हंगामासाठी नेरचे पाणी सोडण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज आणि पाणीपट्टी भरून कृष्णा सिंचन विभागाला सहकार्य करावे.

श्री. राजन सिताराम कदम यांचे निधन


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!