तुम्ही WhatsApp चे ग्रुप ॲडमीन आहात तर फलटण पोलिसांचा हा संदेश वाचा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 03 जुन 2024 | फलटण | लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only group admin असा बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोष्ट ग्रुप वर टाकणार नाहीत. जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल; असे मत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी व्यक्त केले आहे.

कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल दरम्यान व निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर सोशल मीडिया तसेच तत्सम ॲप्लीकेशनच्या किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, रिलस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत; असेही त्यांनी जाहीर केले आहे.

याबाबत महाडिक म्हणाले आहेत की; तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!