स्थैर्य, पुणे दि .24 : पुणे ते हतिया (झारखंड) ही 100 वी श्रमिक ट्रेन पुणे येथून दि. 23 जून 2020 रोजी दुपारी 4 वाजता रवाना करण्यात आली. आतापर्यंत परराज्यातील एकूण 1 लाख 25 हजार प्रवासी पुण्यातून श्रमिक ट्रेनमधून रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे ते हतिया ( झारखंड) रवाना झालेल्या या श्रमिक ट्रेन मधुन एकुण 682 प्रवासी रवाना करण्यात आले. त्यापैकी 618 प्रवासी झारखंडला, 57 प्रवासी उड़ीसा तर 7 प्रवासी पश्चिम बंगाल येथे पाठवण्यात आले. आता पर्यंत पुणे येथून 1 लाख 25 हजार प्रवासी श्रमिक ट्रेनने त्या त्या राज्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत.