
दैनिक स्थैर्य । 10 जून 2025। सातारा । सातारा शहरात सध्या हापूस, पायरीनंतर देशी वाणाचे आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत आहेत. जून संपतो पर्यंत हा लालबाग जातीचा केशरी, लाल, पिवळ्या रंगाचा आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाला असून मंगळवारी साजर्या होणार्या वटपौर्णिमेच्या सणासाठी महिलांना ओटी भरण्यासाठी आंबा हा हवाच त्यामुळे हा आंबा सध्या 100 ते 120 रुपये प्रति किलो दराने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे ,राजवाडा परिसरात टिपलेले आहे. (छायाचित्र : अतुल देशपांडे)