सातारा-कास रस्त्यावर सापडली मानवी कवटी व हाडे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सोनवडी, दि. १६: सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्‍वर घाटात मानवी कवटी, हाडे तसेच जळालेल्या अवस्थेत चप्पल सापडल्याने परिसर हादरून गेला आहे. सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, यवतेश्‍वर घाटात मानवी हाडे असल्याची माहिती पोलिसांना समजली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निर्जनस्थळी कवटी, हाडे व इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या. दुपारी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. दरम्यान, परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!