दैनिक स्थैर्य | दि. १६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्याबद्दल विशेषत: युवा मतदारांमध्ये मोठी क्रेझ असल्याचे चित्र प्रचारादरम्यान पहायला मिळत आहे. ठिकठिकाणी प्रचार दरम्यान युवा मतदारांना भेटत असताना अनेकजण स्वत:हून फोटोसाठी पुढे येत आहेत. यातून तरुण मतदारांच्या मनात काय आहे? याचे संकेत मिळत आहेत’’, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिली.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचे वारे जोमात वाहत असून संविधान समर्थन समिती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
या प्रचारदौर्यातील अनुभव कथन करताना नितीन यादव म्हणाले, ‘‘यंदाच्या निवडणूक निकालात तरुण मतदारांचे कौल निर्णायक ठरणार आहे. तालुक्यातील तरुणांना अभ्यासू, सर्व प्रश्नांची जाण असणारा, समाजकार्यात तत्पर असणारा आणि स्वत:ची वेगळी ओळख असणारा आमदार हवा आहे. हे सर्व गुण प्रा.रमेश आढाव यांच्यात असल्याने हा वर्ग आपसूक त्यांच्याकडे आकर्षिला जात आहे. मतदारांच्या गाठीभेटी दरम्यान अनेक गावात तरुण वर्ग स्वत:हून प्रा.रमेश आढाव यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत आहे. तालुक्याला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी परिवर्तन आवश्यक असून जाणकार व्यक्तीमत्त्व म्हणून प्रा.रमेश आढाव उत्तम पर्याय असल्याचे मतदारच बोलून दाखवत आहेत.’’
‘‘प्रा.रमेश आढाव हे पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शिक्षण, राजकीय अशा सर्वच क्षेत्राशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेले असल्यामुळे सर्वसामान्य मतदारांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत ते जास्त परिचिति व्यक्तीमत्त्व आहे. तालुक्यातील युवा वर्गाला राजकारण नको तर विकास आणि त्यासाठी सक्षम आमदार हवा आहे. त्यामुळेच हा वर्ग प्रा.रमेश आढाव यांना पाठींबा देताना दिसत असून युवा मतदारांच्या पाठींब्यावरच प्रा.रमेश आढाव विजयी होतील’’, असा विश्वासही नितीन यादव यांनी व्यक्त केला आहे.