दहिवडीत आरोग्य सभापतींचे घर फोडून ११ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंची रोकड लंपास

दैनिक स्थैर्य | दि. १८ जुलै २०२६ | दहिवडी |
दहिवडीत मध्यरात्री चोरट्यांनी नगरपंचायतीचे आरोग्य सभापती सुरेंद्र मोरे यांच्या बंगला फोडून घरफोडी केली. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील तिजोर्‍यांमधील ३ लाख ४१ हजार ९०० रुपयांची रोकड आणि ११ तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने, दोन स्मार्ट वॉच व कागदपत्रे असा सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घरफोडी प्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिवडी येथील मायणी रस्त्यावर असलेल्या मोरे मळ्यात सुरेंद्र मोरे हे कुटुंबासह ‘सीताराम पॅलेस’ या बंगल्यात राहण्यास असून मध्यरात्री घरातील सर्व सदस्य जेवण करून वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते. सकाळी सुरेंद्र मोरे यांच्या लहान भावाने त्यांना उठवून तळमजल्यावरील खोल्यांचे दरवाजे उघडे असल्याचे सांगितले. त्यानंतर घराची पाहणी केली असता सुरेंद्र मोरे यांच्या आणि त्यांचा मुलगा आदित्य यांच्या बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.
या चोरीचा अधिक तपास दहिवडी पोलीस करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!