स्थैर्य, दि.८: शेतकऱ्यांच्या भारत बंददरम्यान
एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज
सायंकाळी 7 वाजता शेतकऱ्यांना भेटण्यासाठी बोलवले आहे. भारतीय शेतकरी
युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की,
‘आम्ही सध्या सिंधु बॉर्डरकडे जात आहोत, तिथून गृह मंत्री अमित शाह यांना
भेटण्यासाठी जाणार आहोत.’ अमित शाह पहिल्यांदाच शेतकऱ्यांना भेटत आहेत.
तिकडे, चार तासांच्या चक्का जामनंतर हळु-हळू आंदोलक रस्त्यावरुन कमी होताना
दिसत आहेत.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली
शेतकऱ्यांची
बुधवारी सरकारशी सहावी भेट होणार आहे. यापूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री
मनोहर लाल खट्टर यांनी आज दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. तिकडे, टिकरी बॉर्डरवर आलेल्या
शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायदे परत घेईपर्यंत आंदोलन वापस घेणार नसल्याचे
म्हटले आहे.
AAP चा आरोप- केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले
दरम्यान,
आम आदमी पार्टी (AAP) ने आरोप लावला आहे की, दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवले होते. त्यांच्या घरी
कोणालाच जाण्याची परवानगी नव्हती. परंतू, पोलिसांनी या आरोपांचे खंडन केले
आहे.
बंगाल, ओडिशामध्ये डाव्या पक्षांनी रेल्वे अडवल्या
कोलकातामधील
जादबपूर रेल्वे स्टेशनवर डाव्या (डाव्या पक्षांच्या) कामगारांनी गाड्या
अडवल्या आणि रुळावर बसले. भुवनेश्वर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी गाड्या
अडवल्या आहेत.
शेतकरी म्हणाले- सर्वसामान्यांना त्रास होऊ देणार नाही
भारतीय
शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की आम्ही शांततेत निदर्शने
करू. जे लोक बंदमध्ये अडकले आहेत त्यांना आम्ही 2-3 तास पाणी आणि फळे देऊ.
गुजरातमध्ये 3 हायवेवर आंदोलन
अहमदाबाद-विरमगाम
हायवेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केले. यामुळे ट्रॅफिक
जाम झाला. आंदोलकांनी वडोदरा आणि भरुचमध्ये नॅशनल हायवे जाम केला.
पोलिसांनी अहमदाबादमध्ये काही लोकांना अटकेत घेतले आहे.