राजू शेट्टी यांनी स्वत:च्या घराबाहेरच केली कृषी विधेयकांची होळी


 

स्थैर्य, कोल्हापूर, दि.८: केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या
नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार
पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या
शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला
नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना,
राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी
समर्थन दिलं होते.

नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद
ठेवण्यात आले होते. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू
शेट्टी यांनी शिरोळ येथील त्यांच्या घराबाहेर कृषी विधेयकांची होळी करीत
केंद्र सरकारने तातडीने भांडवलदारधार्जिने कृषी कायदे रद्द करावेत, अशी
मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे
रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार
आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा
काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी
संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार
आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार
आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे
पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!