पदवीधर मतदानासाठी एक डिसेंबरला सुटी, निवडणूक अधिकारी बोरकरांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, सातारा, दि.१३ : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान
एक डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत होणार आहे. या दिवशी
मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी संबंधितांना विशेष
नैमित्तिक रजा देण्यात यावी, अशी सूचना उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर
यांनी केली आहे. 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून 2011 च्या शासन
निर्णयानुसार मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर
करण्यात यावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजे
व्यतिरिक्त असणार आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधितांनी योग्य ती
कार्यवाही करावी, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले आहे. 

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!