
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : ब्राह्म्ण गल्ली, फलटण येथील प. पु. योगीराज दादामहाराज समाधी मंदिर मठात रोज ओ. पी. डी. दवाखाना सुरु राहणार आहे. सध्या फलटण शहरात व तालुक्यात कोरोना या आजराचे रुग्ण वाढत आहेत तरी रुग्णांना प्राथमिक उपचार वेळेत मिळावे व कोरोना नसेल तर अश्या रुग्णांना डॉक्टरांची सेवा त्वरित मिळावी म्हणून प. पु. योगीराज दादामहाराज समाधी मंदिराच्या वतीने ओ. पी. डी. दवाखाना सुरु करण्यात आलेला आहे. मा. दीक्षित सरांच्या हस्ते सदरील दवाखान्याचे उदघाट्न नुकतेच करण्यात आलेले आहे. तर सदरील दवाखान्यात डॉ. माने हे नियमित आरोग्य सेवा देणार आहेत.
