मुसळधार पावसाने सातारा परिसराला झोडपले


दैनिक स्थैर्य । 20 मे 2025। सातारा । गेले दोन दिवस हलक्या स्वरूपात पडणार्‍या अवकाळी पावसाने आज सोमवारी सायंकाळी मात्र कहरच केला सायंकाळी साडेसात पासून जोराच्या आणि मुसळधार स्वरूपात पडणार्‍या या अवकाळी पावसामुळे सातारकरांना अक्षरशः भयभीत करून सोडले .

सोमवारी सकाळी सात वाजता ही सुमारे अर्धा तास या पावसाचे जोरदार स्वरूपात आगमन झाले होते. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत पडत होता. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे तसेच सायंकाळपासून पावसाची चिन्हे दिसू लागल्यामुळे सातारकरांनी आपले व्यवहार आटोपते घेतले होते. मेघगर्जनेसह जोराचा वारा आणि सायंकाळी सहानंतर काळोख पसरलेल्या वातावरणातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे सातारकरांना अधिकच भीतीचे वातावरण वाटत होते. त्यातच जोराचा पाऊस सुरू झाल्यावर रस्त्याच्या मधोमध वाहणारे पाण्याचे लोट अक्षरशः धडकी भरवणारे ठरत होते.

सायंकाळच्या वेळेस सुरू झालेले या पावसामुळे चाकरमान्यांना घरी परतताना अक्षरशः आडोसा सोडण्यासाठी धावपळ करावी लागली. संपूर्ण मुख्य रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. त्यातच सातारा येथील शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मोठे विघ्न निर्माण झाले आज एकूण बारा सामने खेळवले जाणार होते. मात्र मैदानावर पाण्याचे लोट वाहत असल्यामुळे अक्षरशः हे सामने रद्द करावे लागले आणि संयोजकांना खेळाडूंची निवासाकडे पुन्हा व्यवस्था करण्याची वेळ आली. एकंदरीतच हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत येणारा परिसरात पिकणारा देशी आंबाही मोठ्या प्रमाणात शेतात गळून पडल्याचे चित्र आहे.


Back to top button
Don`t copy text!