संभाजी महाराजांचा त्याग व बलिदान जगात सर्वश्रेष्ठ

शंतनु परांजपे; प्रतिपशचंद्र युवक समितीच्यावतीने संभाजी महाराज जयंती उत्साहात


दैनिक स्थैर्य । 20 मे 2025। बारामती। छत्रपती संभाजी महाराज यांनी कमी वयातील केलेले कार्य व त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान हे जगातील सर्वश्रेष्ठ बलिदान असल्याचे प्रतिपादन इतिहासकार व्याख्याते शंतनू परांजपे यांनी केले.
प्रतिपशचंद्र युवक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय केलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास नगरसेवक जयसिंग देशमुख, अ‍ॅड भार्गव पाटसकर, बापूसाहेब जाचक, किशोर हिंगणे, प्रतिपशचंद्र युवक समितीचे अध्यक्ष सुरेश घाडगे, कार्याध्यक्ष निलेश जाधव, खजिनदार शुभम बर्डे, सचिव प्रशांत फडतरे, सदस्य मनोज माने, नागेश वाघमोडे, सुहास गायकवाड, गणेश कोकीळ आदी मान्यवर उपस्थित होते.

शंतनू परांजपे म्हणाले, संभाजी महाराज यांना स्वकीयांबरोबरच परकीय शत्रूशी लढावे लागले. कमी वयात त्यांनी स्वराजसाठी केलेले कार्य इतिहासात स्मरणीय राहील.

वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. सुनील पवार, शेती क्षेत्रामध्ये दिलेले योगदानाबद्दल अमित जगताप, गोरक्षक म्हणून विष्णू हिंदू परिषद सातारा जिल्हा प्रमुख शरद गाडे, राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अविनाश तायडे, हिंदू राष्ट्र सेना प्रमुख बारामतीचे अध्यक्ष विकी आगम आदींना विविध क्षेत्रातील योगदानबद्दल सन्मानित करण्यात आले. भावी पिढीस छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष सुयश घाडगे यांनी सांगितले. सावळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!