दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२३ । मुंबई । राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) प्रकल्पाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आढावा घेतला.
या प्रकल्पासंदर्भात सेवा सदन या शासकीय निवासस्थानी वैद्यकीय शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक झाली. या बैठकीला सचिव अश्विनी जोशी, सचिव जयश्री भोज आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी वैद्यकीय आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) प्रकल्पाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती जाणून घेतली. तसेच या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश देखील अधिकाऱ्यांना दिले.