
दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२२ । सातारा । खासदार उदयनराजे भोसले यांनी निर्धार शिव सन्मानं आंदोलनासाठी रायगडला रवाना होण्यापूर्वी खळबळजनक वक्तव्य केले .एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छाटावीशी वाटतात, असा संताप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
रायगड आक्रोश आंदोलनासाठी ते आज (दि.२) रायगडाला रवाना झाले. त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगडला जाण्यापूर्वी जलमंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी राज्यकर्त्यांवर नाव न घेता संताप व्यक्त केला. ते पुढे म्हणाले मला कोणाचा फोन आला नाही. मला कोणाची परवा नाही, असे वाटतंय एका एकाची मुंडकी छाटावी, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या आई वडिलांचा जर कोणी अपमानं केला तर आपल्याला सहनं होईल का ? मग मी राजघराण्यात जन्म घेतला असताना छत्रपती शिवरायांचा सातत्याने केला जाणार उपमर्द मी कसा सहनं करू असा रोखठोक सवाल त्यांनी केला .
जलमंदिरच्या परिसरात शेकडो शिवभक्त उदयनराजे यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवरायांच्या अवमानप्रकरणी राज्यकर्ते व सत्ताधार्यांवर निशाणा साधला नरेंद्र पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणाचे समर्थन केले होते . त्यामुळे उदयनराजे यांनी पुन्हा तीव्र नाराजी व्यक्त करत नरेंद्र पाटलांनी चुकीच्या वक्तव्यांना समर्थनं देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली . खासदार उदयनराजे व त्यांच्या समर्थकांचा ताफा जल मंदिर येथून पोवई नाक्यावरील शिवपुतळ्याकडे रवाना झाला . ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादनं केले . शेकडो उदयनराजे समर्थकांनी पोवई नाक्यावर गर्दी केली होती . तेथून उदयनराजे सातारा पाचवड, वाई महाबळेश्वर प्रतापगड व पोलादपूर घाट मार्गाने पाचाडच्या दिशेने मार्गस्थ झाले .