एच डी ए डान्स अकॅडमीचे उन्हाळी शिबिर उत्साहात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 18 मे 2025। बारामती । विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच नृत्य कौशल वाढीसाठी एच डी ए डान्स अकॅडमी यांच्या वतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. यांचा समारोप उत्साहात करण्यात आला.
या प्रसंगी एच डी ए डान्स अकॅडमी चे संचालक विकास पवार, हॉटेल व्यवसायिक अदिती दिलीप पाटील, अक्षय कबीर, कुणाल सोनवणे, सौरभ जाधव ,बाईक रायडर रोहित शिंदे व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अदिती दिलीप पाटील म्हणाल्या, विद्यार्थी ना नृत्य कला शिकवत असताना आत्मविश्वास वाढतो, व्यासपीठावर अभिनय व संभाषण कला सादरीकरण करण्याचे धाडस येते. तणाव कमी होतो त्यामुळे नृत्य शिकणे ही काळजी गरज आहे.

प्रशिक्षक विकास पवार म्हणाले, हजारो लोकांसमोर धाडसाने बोला. अभिनय करणे, नृत्य सादर करण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यावे. त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव भेटावा म्हणून या उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये प्राथमिक स्वरूपातील व गरजेनुसार अ‍ॅडव्हान्स नृत्य कला, अभिनय, संभाषण,स्टेज डेअरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!