हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, मुंबई, दि. ०५ : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच अंजर्ला येथे ग्रायन्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मुंबई येथील त्यांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार योगेश कदम, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, नियोजन अधिकारी बढीए तसेच मच्छिमार संघटनेचे सोमनाथ पावशे, हेमंत चोगले, बाळकृष्ण पावशे, दत्ताराम पेढेकर, पीएन चोगले, काशिनाथ पावशे, गोपीचंद चोगले आदी उपस्थित होते.

श्री. सत्तार म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे हे प्रमुख बंदर आहे. या बंदराचा विकास झाल्यास मच्छिमार बांधवांना अडचणींना सामना करावा लागणार नाही. पावसाळ्यात वादळापासून बोटींच्या संरक्षणासाठी तेथे सुविधा तयार करण्यात येतील. याबाबत आमदार योगेश कदम आणि मच्छिमार बांधवांनी मागणी केली होती. तसेच बोटी लावण्यासाठी सध्या मच्छिमार बांधवांना आंजर्ले खाडीमध्ये जावे लागते. या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने अपघात होतात. त्या आंजर्ले खाडीच्या येथेही बंधारे बांधण्याची मागणी यावेळी मच्छिमार बांधवांनी केली. या दोन्ही मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन या यावेळी श्री. सत्तार यांनी दिले.

Back to top button
Don`t copy text!