मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि 27 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात पंतप्रधान म्हणतात की, वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!