ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे हनुमंतवाडी गाव सतर्क; रात्रीचा फायदा घेऊन चोर पसार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 12 जानेवारी 2024 | फलटण | तालुक्यातील हनुमंतवाडी येथे दि. १२ जानेवारी रोजी रात्री १ वाजता चोर आले होते. गावामधील लालासाहेब पवार यांच्या घराचे कुलूप तोडून पाच हजार रुपये रोकड चोरांनी चोरली. यासोबतच अजून एका ठिकाणी चोरी करताना गावचे पोलीस पाटील जगदीश गाडे यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व गावाला याबाबत माहिती कळवली. त्यामुळे गावकरी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले; चोरांचा पाठलाग सुद्धा गावकर्यांनी केला परंतु रात्रीचा फायदा घेत चोरांनी पोबारा केला. संपूर्ण गाव सतर्क झाल्याने पुढील अनर्थ टळला आहे; अशी माहित ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!