हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवते केस गळतीची समस्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० एप्रिल २०२३ । मुंबई । केस गळणे किंवा टक्कल पडणे याचा संबंध अनेकदा आनुवंशिकतेशी जोडला जातो पण खरं तर केस गळतीस अनेक घटक कारणीभूत ठरतात. काहीवेळा केस गळतीची समस्या ही आरोग्याशी संबंधित समस्येचा दुष्परिणाम देखील असू शकते त्यामुळे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. डॉ. बत्रा’ज हेल्थकेअरचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि ट्रायकोलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन (यूके)चे अध्यक्ष डॉ अक्षय बत्रा सांगतात की पुरुषांचे सेक्स हार्मोन्स किंवा अ‍ॅन्ड्रोजेन्सचा अतिरेक आणि हार्मोनल असंतुलन ही केस गळण्याची सर्वात सामान्य कारणे आहेत जसे की अ‍ॅन्ड्रोजेनिक अ‍ॅलोपेसिया. फिमेल-पॅटर्न बाल्डनेस (महिलांना टक्कल पडणे)मध्ये अ‍ॅन्ड्रोजेन्स केसांच्या कूपांना कमकुवत करू शकतात परिणामी जास्त प्रमाणात केस गळती होऊ शकते. अ‍ॅस्ट्रोजेन-संबंधित बदल, जसे की गर्भनिरोधक वापर किंवा रजोनिवृत्ती दरम्यान अ‍ॅन्ड्रोजन संवेदनशीलता वाढू शकते. केस गळणे किंवा टक्कल पडणे, मग ते अनुवांशिक असो किंवा हार्मोन्समुळे होमिओपॅथीद्वारे त्यावर यशस्वीरित्या उपचार केले जाऊ शकतात.

डॉ. अक्षय बत्रा सांगतात, होमिओपॅथी उपचाराने हे सर्व आजार बरे होतात आणि केस गळण्याच्या मूळ कारणाचे देखील निराकरण होते. होमिओपॅथिक औषध हे वारंवार केस गळतीचे मूळ कारण ठरणा-या तणाव, चिंता यांसारख्या मानसिक आणि भावनिक समस्यांची देखील काळजी घेते. ते मनावर लक्ष केंद्रित करून मन आणि शरीराचे संतुलन पुनर्संचयित करते, ज्यामुळे रुग्णावर पूर्णपणे उपचार करता येतात.

अहमदाबादमधील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजीशी संबंधित हृदयरोग तज्ञांच्या पथकाने १९०० हून अधिक लोकांवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की मेल पॅटर्न बाल्डनेस (पुरुषांना टक्कल पडणे) आणि केस लवकर पांढरे होणे अशा समस्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका पाचपट जास्त असतो. अभ्यासात असेही आढळून आले आहे की हृदयविकाराचा झटका आलेल्या सुमारे ५०% रुग्णांना अ‍ॅन्ड्रोजेनिक अ‍ॅलोपेसिया होते, ज्याला सामान्यतः मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणून ओळखले जाते. गर्भधारणेमुळे हार्मोन बदलणे, बाळाला जन्म देणे, रजोनिवृत्ती आणि थायरॉईडच्या समस्यांसारख्या विविध परिस्थितींमुळे स्त्रियांमध्ये कायमची किंवा तात्पुरते केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ५० वर्षांच्या वयापर्यंत ४०% स्त्रियांवर केस गळतीचा परिणाम होतो.


Back to top button
Don`t copy text!