मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० एप्रिल २०२३ । नवी दिल्ली । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्रीमहाराष्ट्रातील मंत्रीखासदारआमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अयोध्येतील मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन घेतले. तसेच त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर उभयतांनी अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसराला भेट देऊन बांधकामाची पाहणी  करून त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलग्राम विकास मंत्री गिरीष महाजनबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेअन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईरोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेकामगार मंत्री सुरेश खाडेशालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरउद्योग मंत्री उदय सामंत यासोबतच खासदार राहुल शेवाळेश्रीकांत शिंदेहेमंत पाटीलकृपाल तुमाणेसदाशिव लोखंडेश्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!